Chanakya Niti For Life Partner: आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या नीतिशास्त्रातील बाबी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे कोणती बाब कशी असावी आणि चाणक्य नीति काय सांगते, याबाबत आजही विचार केला जातो. चाणक्य नीतित जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. व्यक्तीचं वैवाहिक जीवन जोडीदाराच्या (Married Life) स्वभावावर अवलंबून असतं. चांगला जोडीदार सुख-दुखात तेवढीच साथ देतो. त्यामुळे वाईट दिवस कधी सरतात कळत देखील नाही. पण जर जोडीदाराचे विचार दुषित असतील तर मात्र चांगल्या दिवसातही जगणं कठीण होऊन जातं. चाणक्य नीतित याबाबत सांगण्यात आलं आहे. चला तर जाणून घेऊयात चांगला जोडीदार कसा ओळखावा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याग भावना - पती-पत्नीचं नातं केवळ प्रेमातूनच नाही तर एकमेकांप्रती त्यागाच्या भावनेतूनही बहरतं.  अशी भावना नसेल तर तो जोडीदार तुम्हाला कधीही फसवू शकतो. त्याग केवळ स्त्रियांच्या बाजूनेच नाही तर पुरुषांच्या बाजूनेही आवश्यक आहे. तरच वैवाहिक जीवन सुखी होते.


स्वभाव आणि चारित्र्य- स्त्रीची ओळख चारित्र्य आणि तिच्या स्वभावावरून होते. जर एखाद्या स्त्रीचे चारित्र्य किंवा स्वभाव आपल्यास अनुरूप नसेल तर तिच्यापासून दूर जाणे चांगले ठरेल. चाणक्य नीतिनुसार, अशी महिला तुम्हाला कधीही फसवू शकते.


चांगले गुण- नाते टिकवण्यासाठी व्यक्तीचे गुणही महत्त्वाचे असतात. कुटुंब सांभाळण्यासाठी स्त्रीचे गुण खूप महत्त्वाचे असतात. चांगले गुण असलेली स्त्री कुटुंबासाठी आणि पती दोघांसाठी भाग्यवान ठरते. दुसरीकडे, अवगुणांनी भरलेली स्त्री कुटुंब, पती आणि समाजासाठी वेदनादायक ठरू शकते.


स्वार्थी स्वभाव - स्वार्थी स्त्री ना चांगली आई बनू शकते आणि ना चांगली पत्नी. स्त्रीमध्ये त्यागाची भावना तिला तिच्या पतीशी अधिक निष्ठावान बनवते. नेहमी स्वतःचा विचार करणारी स्त्री कधीही फसवू शकते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)