मुंबई : आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे ज्यांच्याकडून कधीही मदत मागू नये. या लोकांकडून मदत मागणं महागात पडण्याची शक्यता असू शकते. चाणक्य नीतिनुसार कोणत्या 3 प्रकारच्या लोकांनी मदत मागू नये, चला जाणून घेऊया.


स्वार्थी व्यक्ती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा लोकांची माफी मागू नये जे स्वार्थी आहेत. असे लोक समोरून चांगलं बनण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुमच्या मागे वाईट होतात. ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमचे कितीही नुकसान करू शकतात.


ईर्ष्यावान लोक 


एखाद्या व्यक्तीने मत्सर करणाऱ्या लोकांची माफी मागू नये. असे लोक तुमच्यासमोर मदतीचे नाटक करतात. पण तुमचं यश त्यांना सहन होत नाही. ते थांबवण्यासाठी ते तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करतात.


रागीष्ट व्यक्ती


राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. रागावर नियंत्रण ठेवता येत नाही अशा व्यक्तीची मदत कधीही घेऊ नका. असे लोक कठीण काळात तुमची समस्या आणखी वाढवू शकतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)