Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी सांगितलेल्या तत्वांचे पालन आजही लोक करतात, त्याला लोक आज चाणक्य नीती (Chanakya Niti) म्हणून ओळखतात. नातेसंबंधांवर त्यांनी दिलेले उपदेश आजही अनेकांसाठी सुवर्णमार्ग आहे. तर व्यक्तीगत आयुष्यावर देखील त्यांनी सांगितलेला मार्ग अनेकांना मोठ्या उंचीवर पोहचवून आला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात यश अपयश असतंच. मात्र, काही लोकांना आयुष्यात यश (success in life) मिळतच नाही. त्यावर आचार्य चाणक्य यांनी भाष्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय की, जीवनात दोन प्रकारचे लोक असतात... जे लोक कठोर परिश्रम करूनही कधीही यशस्वी होत नाहीत. त्याच्या काही कमतरतांमुळे त्याला पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरं जावं लागतं. अशा कोणत्या दोन व्यक्ती आहेत? जे कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. जाणून घ्या काय म्हणतात आचार्य चाणाक्य.


विचार करतात पण कृती नाही


काही लोक यश मिळवण्यासाठी खूप विचार करतात, मात्र कोणतीही कृती करत नाही. अनेक गोष्टींचा त्यांच्या मनातल्या मनात विचार करत असतात. पण हे लोक त्यासाठी काहीच करत नाहीत. म्हणजे जे विचार करतात पण काही करत नाहीत, असे लोक कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, असं आचार्य म्हणतात.


यशस्वी होण्यासाठी माणसाने विचार करण्याबरोबरच त्याच्या विचारावर कृती करणं नेहमी फायदेशीर ठरतं. यशस्वी होण्यासाठी तुम्ही जी रणनीती तयार करा. तुमच्या नियोजनावर काम करा. केवळ विचार करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. विचारांना कार्याची जोड देणं गरजेचं आहे.


विचार न करता काम करणं


काही लोकं अशी असतात जी खूप कष्ट करतात मात्र, त्यांना यश काही मिळत नाही. झापडं लावल्यासारखं काम करणे योग्य नाही, असं चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलं आहे. एखादं कार्य अखेरीस घेऊन जायचं असेल तर योग्य प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सर्व प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय तुम्हाला काम पूर्णत्वास घेऊन जाता येणार नाही. तुमचे ध्येय साध्य करण्याच्या मार्गात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी नियोजन तुम्हाला मदत करेल. दिशाहीन काम करणाऱ्यांना कधीही यश मिळत नाही, असं चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलंय.


आणखी वाचा - Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' खास गुणांवर महिला होतात फिदा, तुमच्यात आहेत का हे गुण?


दरम्यान, कुटुंबाचा आनंद आणि समृद्धी सर्वांसाठी महत्त्वाची असले. योग्य नियोजनाने काम केल्यास पैसे किंवा वेळ वाया जात नाही. परिणामाची चिंता न करता काम करणं, हे कधीकधी मुर्खपणाचं लक्षण ठरू शकतं, असंही आचार्य सांगतात.