Chanakya Niti For Man : पती-पत्नीचे (Husband Wife) नाते अत्यंत पवित्र मानलं जातं. पण हे नातं विश्वासावर टिकून असतं. अनेकदा गैरसमजामुळे हे नाते तुटते. म्हणूनच हे नाते जपावे लागते. पती-पत्नीच्या (Chanakya Niti For Man) नात्याबाबत आचार्य चाणक्य यांनी काही मूलभूत मंत्र दिले आहेत. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की पती-पत्नीचे नाते कसे दृढ होऊ शकते. पुरुषांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ कसे टिकू शकतात ते आपण जाणून घेऊयात. (chanakya niti women like these habits of men)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाणक्य नीतीनुसार, नातं मजबूत ठेवण्यासाठी पती-पत्नीमध्ये विश्वास असणे आवश्यक आहे. याशिवाय जर पुरुषांनी आपल्या पत्नीला समान दर्जा दिला आणि तिचा आदर केला तर नातं खूप मजबूत आणि कायम टिकते. जे पुरुष आपल्या जोडीदाराला स्वातंत्र्य देतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात, जास्त बंधने घालत नाहीत, तर त्यांचे प्रेमाचे नाते नेहमीच घट्ट राहते. महिलांना असे पुरुष जास्त आवडतात.


आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराने बनतं असं म्हटलं आहे. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास आणि प्रेमावर आधारित असतो. नात्यातील विश्वास तुटला की त्या नात्यात दुरावा निर्माण होणे साहजिकच असते. त्यामुळे जे पुरुष आपल्या जोडीदाराचा आदर करतात, त्यांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात. दुसरीकडे, जे महिलांचा आदर करत नाहीत, त्यांचे प्रेमसंबंध कधीही टिकत नाहीत.


याशिवाय चाणक्य नीतीमध्ये असे सांगण्यात आले आहे की महिलांना अशा पुरुषांसोबत राहणे आवडते जे त्यांना नेहमी सुरक्षित वाटतात. जे पुरुष स्त्रियांचे रक्षण करू शकत नाहीत, स्त्रिया अशा पुरुषांसोबत फार काळ राहत नाहीत. अशी नाती लवकर तुटतात. म्हणूनच पुरुषांनी आपल्या जोडीदाराला सुरक्षित वाटावे आणि त्यांच्या बाजूने भूमिका घ्यावी. पुरुषांचा हा गुण स्त्रियांना खूप आवडतो.