Chandra Grahan 2022: `या` शहरांमध्ये चंद्रग्रहण `या` वेळेत दिसेल; तुमच्या शहरातील वेळ जाणून घ्या
Chandra Grahan 2022 Time in India : 8 नोव्हेंबर 2022 रोजी, 2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. पण वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रहणाची वेळ वेगळी असेल.
Chandra Grahan 2022 Time in India: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर म्हणजे आज होणार आहे. हे चंद्रग्रहण संपू्र्ण भारतातून (Lunar Eclipse 2022 in India) पाहता येणार आहे. या चंद्रग्रहणाची सुरुवात संध्याकाळी चंद्राच्या आगमनाने होईल. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे आजच्या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सकाळी 8.20 पासून सुरू झाला. सुतकात पूजा करणे, खाणे पिणे वर्ज्य आहे. ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करूनच काहीतरी खावे. तसेच ग्रहण आणि सुतक काळात देवाच्या मूर्तीला हात लावू नये.
देशाच्या पूर्वेत्तर भागात चंद्रोदय लवकर होईल त्यामुळे या भागांत 98 टक्के चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022 Time in India) पाहता येईल. या ठिकाणी चंद्रग्रहण दिसण्याचा कालावधी 3 तासांचा असेल. परंतु पश्चिमेकडी भागात हे चंद्रग्रहण केवळ 1 तास 15 मिनिटे पाहता येईल. या ठिकाणी संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार नाही, ते अंशिक दिसेल.
देशातील प्रमुख शहरांमध्ये चंद्रग्रहणाच्या वेळा
देशाच्या विविध भागांत हे चंद्रग्रहण (Chandra Grahan) दिसण्याच्या वेळेत थोडा फरक असेल. त्याचप्रमाणे कुठेतरी पूर्ण चंद्रग्रहण दिसेल तर कुठे अर्धवट चंद्रग्रहण दिसेल. उदाहरणार्थ, कोलकाता, गुवाहाटी, पाटणा, रांची आणि इटानगरमध्ये स्पष्ट आणि पूर्ण चंद्रग्रहण दिसेल. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये दिसणार चंद्रग्रहणाची वेळ जाणून घेऊया.
महाराष्ट्रात चंद्रोदयाची वेळ आणि ग्रहणाचा कालावधी ( Chandra Grahan Time and duration in maharashtra )
गडचिरोली – चंद्रोदय 5.30 वाजता – कालावधी 49 मिनिटे
नागपूर – चंद्रोदय 5.32 वाजता – कालावधी 47 मिनिटे
चंद्रपूर – चंद्रोदय 5.33 वाजता – कालावधी 46 मिनिटे
बुलढाणा – चंद्रोदय 05.45 वाजता – कालावधी 35 मिनिटे
कोल्हापूर – चंद्रोदय 05.59 वाजता – कालावधी 20 मिनिटे
मुंबई – चंद्रोदय 06.01 वाजता – कालावधी 18 मिनिटे
नाशिक – चंद्रोदय 5.56 वाजता – कालावधी 23 मिनिटे
पुणे – चंद्रोदय 5.58 वाजता – कालावधी 21 मिनिटे
वाचा : घरबसल्या ATM मधून कमवा लाखो रूपये; कसं ते जाणून घ्या
शहर आणि चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ
नवी दिल्लीतील चंद्रग्रहण वेळ - संध्याकाळी 05:32
कोलकातामध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 04:56
चेन्नईमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:42
पाटण्यात चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:05
रांची मध्ये चंद्रग्रहण वेळ - संध्याकाळी 05:07
भोपाळमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:40
रायपूरमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:25
जयपूरमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:41
डेहराडूनमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:26
चंदीगडमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:31
शिमला मध्ये चंद्रग्रहण वेळ - 05:29 PM
जम्मूमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:35
श्रीनगरमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:33
लखनौमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:20
नोएडामध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:32
कानपूरमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:23
वाराणसीमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:14
गुडगावमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:33
भुवनेश्वरमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - संध्याकाळी 05:10
गुवाहाटीमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - दुपारी 04:37
इटानगरमध्ये चंद्रग्रहणाची वेळ - सायं
अहमदाबादमधील चंद्रग्रहण वेळ - संध्या
पुढील चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी (Next lunar eclipse on October 28, 2023)
चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि जेव्हा ग्रह सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होत असते. जेव्हा संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या छायेखाली झाकला जातो तेव्हा संपूर्ण चंद्रग्रहण होते आणि चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीने झाला जातो तेव्हा अंशिक चंद्रग्रहण होते. भारतातून दिसणारे पुढील चंद्रग्रहण पुढील वर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण आंशिक स्वरुपाचे असेल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास त्याची पुष्टी करत नाही.)