Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर आता लवकरच चंद्रग्रहण असणार आहे. वर्षभरात 2 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे लवकरच असणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहणाकडे खगोलशास्त्रज्ञ वैज्ञानिकदृष्टीकोनातून पाहतात. सूर्यग्रहण हे भारतात दिसलं नव्हतं मग चंद्रग्रहण (lunar eclipse 2023) भारतात दिसणार आहे का? चंद्रग्रहणाला सूतककाल असणार आहे का? असे अनेक प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. (astrology news in marathi)


कधी आहे चंद्रग्रहण आणि वेळ? (Chandra Grahan 2023 in india date and time)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहण होतं. पेनम्ब्रल चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्राच्या बाहेरील भागावर पडते. यावेळी चंद्राचा प्रकाश अंधुक होतो. तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू चंद्राला त्रास देतो तेव्हा चंद्रग्रहण होतं. 


या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 5 मे 2023 शुक्रवारी म्हणजे बुद्ध पौर्णिमेला (Buddha Purnima 2023) आहे. हे चंद्रग्रहण छाया चंद्रग्रहण असेल. हा दिवस वैशाख पौर्णिमा (Vaishakh Purnima 2023) देखील आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे. 


चंद्रग्रहण वेळ


5 मे 2023 रात्री 8:45 वाजता सुरू होईल आणि 6 मे 2023 पहाटे 1:00 वाजता संपणार आहे. चंद्रग्रहणाची परमग्रास वेळ रात्री 10:53 आहे. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतं असतो. मात्र वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात (when is lunar eclipse 2023 in india) दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी (Chandra Grahan 2023 sutak kaal time) हा भारतीयांसाठी वैध नसणार आहे. 


या ग्रहणाचा काही राशींवर शुभ परिणाम दिसून येणार आहे. चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 20:44 पासून सुरू होणार ते शनिवार 06 मे 2023ला मध्यरात्री 01:01 पर्यंत असणार आहे.  (Chandra Grahan 2023 Lunar Eclipse 2023 in india sutak kaal date and time Penumbral Lunar Eclipse in marathi)


वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कुठे दिसणार?


वर्षातील पहिले चंद्रग्रहण (first eclipse of year 2023) म्हणजे पेनम्ब्रल चंद्रग्रहण  (Penumbral Lunar Eclipse). पृथ्वीची सावली चंद्रावर फक्त एका बाजूला असल्याने हे ग्रहण भारताव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणांहून पाहता येईल. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे युरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक अटलांटिक आणि हिंदी महासागरात दिसणार आहे.


वर्षातील दुसरं चंद्रग्रहण कधी आहे? (Second Chandra Grahan 2023 Date)


तर या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 ला असणार आहे. हे वर्षातील शेवटचं ग्रहण असून ते यूरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्वी अमेरिका आणि अफ्रीका या देशात दिसणार आहे.  तर दुसरा सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 होणार आहे.(Second Surya Grahan 2023 Date) 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)