Vinayak Chaturthi 2024 : जानेवारी महिन्यातील पहिली विनायक चतुर्थी ही काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. 14 जानेवारीला चंद्र शनीच्या कुंभ राशीत गोचर केलंय. त्यात आज मकर संक्रांतीचा आदल्या दिवस भोगी तर कुठे लोहरी म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आज चंद्र षष्ठ योग, रवि योग आणि धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार करत आहे. या योगामुळे काही राशींना बंपर आर्थिक लाभ होणार आहे. (Chandra Shashta Yoga on Vinayaka Chaturthi A bumper bonus for these zodiac sign)


वृषभ रास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीचे लोक मालमत्ता खरेदी करणार आहेत. मानसिक तणावातूनही तुम्हाला आराम मिळणार आहे. जीवनात सुरू असलेले सर्व वाद किंवा गैरसमज दूर होणार आहे. तुमच्या भावा-बहिणीशी किंवा नातेवाईकाशी काही वाद चालू असेल तर सूर्यदेवाच्या कृपेने त्यातून मुक्तता मिळणार आहे. नात्यात नवी ऊर्जा मिळणार आहे. मित्रांसोबत रविवारची सुट्टी तुम्ही एन्जॉय करणार आहात. 


कर्क रास 


या राशीचे लोक कुठेतरी बाहेर जाण्याबद्दल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी प्लॅनिंग करणार आहात. कुटुंबातील लोकांच्या चांगल्या वागणुकीमुळे घरात आनंद वातावरण असणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन करून पाहिल्यास तुम्ही पूर्णपणे यशस्वी होणार आहात. व्यावसायिकांनाही चांगला फायदा होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेलं असणार आहे. 


सिंह रास 


या राशीच्या लोकांचा अकडलेला पैस सूर्य देवाच्या कृपेने परत मिळणार आहे. ज्यामुळे मन प्रसन्न असणार आहे. जे कुटुंबिक किंवा भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला नफा मिळणार आहे. सिंह राशीचे लोक प्रत्येक परिस्थिती चांगल्या हाताळण्यात माहीर असतात. तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा फायदा होणार आहे. 


तूळ रास 


या लोकांचे आरोग्य सुधारणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. विद्यार्थी लक्षकेंद्रीत करुन अभ्यास करणार आहात. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध चांगले असणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणार आहात. तुम्ही आधी केलेल्या कामाचं तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. तुमच्या सर्व योजनांमधून तुम्हाला चांगले आर्थिक लाभही मिळणार आहेत. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. 


धनु रास 


तुमची परिस्थिती अनुकूल असणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद असणार आहे. तुमचं भावा-बहिणींसोबतचं संबंध चांगले होणार आहे. तुमच्या आयुष्यात आजवर जो गोंधळ होता तो दूर होणार आहेत. नवविवाहितांच्या घरी नवीन पाहुणे येणार आहेत. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)