Chaturgrahi and Vashi Rajyog : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर ग्रह आपल्या राशीमध्ये बदल करतात. या बदलाला गोचर असं म्हटलं जातं. या दरम्यान, जर 2 ग्रह समान राशीमध्ये येत असतील, तर युती तयार होते. अनेकदा दोन ग्रहांच्या युतीमुळे योग-राजयोग देखील तयार होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रहांचा राजा सूर्यदेव स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे वाशी राज योग तयार होणार आहे. तर दुसरीकडे 17 ऑगस्टला सिंह राशीतही चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. शुक्र, मंगळ, बुध आणि चंद्र यांच्या संयोगातून हा राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या दोन्ही योगांमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घेऊया चतुर्ग्रही योग आणि वाशी राजयोगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे. 


सिंह रास


वाशी राज योग आणि चर्तुग्रही राजयोग राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. आत्मविश्वास आणि उत्पन्नात वाढ होईल. भौतिक सुखांमध्ये वाढ होऊ शकते. मालमत्ता खरेदीसाठी काळ शुभ आहे. कौटुंबिक सदस्यांमधील जुने वाद मिटतील. वैवाहिक जीवन आणि भागीदारीसाठी वेळ शुभ राहील. कौटुंबिक आनंदावर सकारात्मक प्रभाव पडेल.


वृश्चिक रास


वाशी राजयोग तयार होऊन तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होऊ शकते. याशिवाय चतुर्ग्रही राजयोगाचाही तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम करणार आहे. नोकरी-व्यवसायात वेळेत यश मिळू शकते. कुटुंबामध्ये धार्मिक कार्य होईल. कोणत्याही व्यवसायात असाल तरी तुमची आर्थिक प्रगती होईल. 


धनू रास


वाशी आणि चतुर्ग्रही योग तयार होऊन या राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता. लव्ह लाईफ देखील खूप चांगली राहील. नोकरीच्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या मनाजोग्या होणार आहेत. व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो.


वृश्चिक रास


वाशी राजयोग आणि चतुर्ग्रही राजयोग तयार होऊन तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होऊ शकते. यावेळी उत्पन्नाची साधनं वाढणार आहेत. नोकरी-व्यवसायात वेळेत यश मिळू शकणार आहे. कोणत्याही व्यवसायात असाल तरी तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )