Chaturgrahi Yog In Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह विशिष्ट कालावधीत राशी बदलतात. यामुळे त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार होता. ऑगस्टमध्ये बुध ग्रहांचा राजकुमार आणि सूर्य ग्रहांचा राजा सिंह राशीत भ्रमण करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय ज्योतिष्य शास्त्रानुसार, धनदाते शुक्र आणि चंद्र हे ग्रहही सिंह राशीत असणार आहे. अशा स्थितीत या ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या पार्टनरसोबतच्या नात्यातही गोडवा येणार आहे.


सिंह रास (Leo Zodiac)


चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येणार आहे. या काळात नशिबाच्या मदतीने अनेक कामे सहज पूर्ण होतील. योग्य पदोन्नती प्राप्त करण्यासाठी किंवा नवीन करिअर सुरू करण्याच्या संधी देखील उघडू शकतो. आता करिअरमध्ये प्रगती आणि पगार वाढीसाठी चांगल्या संधी मिळणार आहे. तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक उत्कृष्ट संधी मिळतील. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. 


धनु रास (Dhanu Zodiac)


चतुर्ग्रही योग तयार झाल्याने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. या काळात तुमची बुद्धिमत्ता विकसित होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकणार आहे. या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. पैसे वाचवण्यास देखील सक्षम व्हाल. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. तुम्हाला चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. तसेच तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )