मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक उलाढाली कराल. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. व्यावासायिक कामांमध्ये यश मिळेल. भविष्याच्या दृष्टीनं एखादी योजना आखाल. अनेक कामांना गती मिळेल. 


 


वृषभ (Taurus)


अधिकाऱ्यांशी ताळमेळ राखा. फायदाच होणार आहे. कामामध्ये यश मिळणार आहे. आज एखाद्या कामात यश मिळेल.


 


मिथुन (Gemini)


सर्वच क्षेत्रांमध्ये तुम्हाला प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. कामात यश मिळेल. एककेंद्री राहा. इतरांमध्ये असणारे मतभेद तुम्ही मिटवाल. 


 


कर्क (Cancer)


परिस्थितीनुरुप निर्णय घ्या फायदाच मिळेल. एखाद्या अशा व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल जी व्यक्ती तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे. नोकरीमध्ये यश मिळेल.


 


सिंह (Leo)


आज सामंजस्य राखा. जबाबदाऱ्या पार पाडा. जोडीदाराचं यश तुम्हाला आनंद देणार आहे. एखादी आखलेली योजना मार्गी लागेल. 


 


कन्या (Virgo)


नोकरीमध्ये पदोन्नतीचा योग आहे. मेहनतीला यश मिळणार आहे. आत्मकेंद्री राहा. वर्तणुकीत अनुशासन राहुद्या. 


 


तूळ (Libra)


एखाद्या अनोख्या कामाची जबाबदारी मिळेल. रचनात्मक कार्य तुमच्या वाट्याला येणार आहे. शिक्षणात चांगली प्रगती करण्याचा योग आहे. 


 


वृश्चिक (Scorpio)


धीरानं काम करत राहा, तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये यश मिळणार आहे. आपल्या माणसांशी ताळमेळ साधा. नव्या संधीचं सोनं करा. 


 


धनु (Sagittarius)


जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलणार आहे. आपल्या माणसांची साथ तुम्हाला यश देणार आहे. मित्रांची भेट घेण्याचा योग येईल. 


 


मकर (Capricorn)


कुटुंबात आनंदवार्ता कळणार आहे. सुख नांदणार आहे. वडिलांचा सल्ला तुम्हाला मोठी मदत करणार आहे. 


 


कुंभ (Aquarius)


सध्याचा काळ सकारात्मक आहे. त्यामुळं मिळालेल्या संधीचं सोनं करा. नव्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. 


 


मीन (Pisces)


सारासार विचार करूनच एखादा निर्यय घ्या. आज तुम्ही जे काही दान कराल ते तुम्हाला फळणार आहे. नव्या ठिकाणाला भेट देण्याचा योग आहे. 


 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)