1 March 2023 Horoscope: मार्च महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? जाणुन घ्या 12 राशींचे राशीभविष्य
कसा असेल आजचा दिवस. जाणून घ्या आजचे राशीभविष्य (1 March 2023 Horoscope).
Daily Horoscope 1 March 2023 : फेब्रुवारी महिला संपला आहे. कॅलेंडरचे पान पलटून मार्च हा नविन महिना सुरु झाला आहे. मार्च महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? अनेक राशींसाठी आजचा दिवस शुभ दिवस ठरणार आहे. जाणुन घ्या 12 राशीचे राशीभविष्य (1 March 2023 Horoscope).
मेष (Aries)
आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात मोठा नफा मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करत असल्यांनी व्यवसायात काही बदल करण्याचा निर्णय घेतल्यास हे बदल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या सोपवतील. अविवाहित लोकांचे संबंध पुढे जाऊ शकतात. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.
वृषभ (Taurus)
नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. उत्पन्नाच्या भरपूर संधी मिळतील. योग्य संधीचे सोनं साधा. घरातील वडिल धाऱ्यांच्या आशिर्वाद घेवून नव काम हाती घ्या. यश नक्की मिळेल.
मिथुन (Gemini)
मालमत्तेशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. मित्रांद्वारे उत्पन्नाच्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना दिसतील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
कर्क (Cancer)
पैसे गुंतवणुकीच्या योजना तुम्हाला आकर्षित करु शकतात. मात्र. विचारपूर्वक आणि सल्ला घेवून गुंतवणुक करावी. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील.
सिंह (Leo)
मनोकामना पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामामुळे तणाव आणि थकवा जाणवेल. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतो. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे.
कन्या (Virgo)
व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची संधी मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून तुम्हाला वडिलोपार्जित धन मिळेल. उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळेल. तुमचे उत्पन्नही वाढेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग येवू शकतो.
तूळ (Libra)
कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उद्या कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग येवू शकतो. व्यवसायात यश मिळेल. नवीन कामे मिळू शकते. रखडलेले पैसे मिळतील. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही फेडू शकाल. लग्न जुळण्याचा योग येवू शकतो.
वृश्चिक (Scorpio)
रखडलेले काम पूर्ण होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर दिवस चांगला आहे.घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा उद्या पूर्ण होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. घरात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील.
धनु (Sagittarius)
सामाजिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. यामुळे प्रभावशाली लोकांशी संपर्क होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा, विशेषतः रागाला आवर घाला. विनाकारण खर्च टाळा. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. रिअल ईस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांना संधी मिळेल.
मकर (Capricorn)
अज्ञात व्यक्तीशी अचानक वाद होऊ शकतो. जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळेल यामुळे नाराजी दूर होईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.
कुंभ (Aquarius)
वैयक्तिक आयुष्याबाबत मित्रांकडून चांगला सल्ला मिळेल. कुटुंबाच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. कोर्टाशी संबधीत कामे पूर्ण होतील.
मीन (Pisces)
अनेक दिवसांपसून आजारी असलेल्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. रखडलेले पैसे परत येतील. नोकरी तसेच व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या.