Daily Horoscope 21 March 2023 : मंगळवारीा भगवान हनुमानाची पूजा केली जाते. या दिवशी  हनुमानाची पूजा केल्याने हनुमानजींच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. मंगळवारी सकाळी लवकर उठून मंदिरात जाऊन हनुमानाला शेंदूर अर्पण करा. अमावस्येचा शुभ दिवस आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तूळ, कन्या, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन यासह सर्व 12 राशींचे राशीभविष्य  जाणून घ्या. 


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरीबांना मदत कराल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. माहिती संकलन करताना तुमची दिशाभूल होऊ शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ होवू शकता. तुमची कामाबद्दलची तळमळ कायम राहील. सकाळी कोणाशी वाद होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. भाग्यवान क्रमांक: 17, शुभ रंग: हिरवा


वृषभ (Taurus)


जुन्या मित्राची भेटू होऊ शकते. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी अचानक झालेली भेट तुम्हाला आनंदी करु शकते. मुले नसल्यामुळे वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात. यशस्वी करिअर सुरू करण्याच्या मार्गावर आहात. सावधगिरीने पुढे जा. आपल्या पालकांच्या फिटनेस आणि आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या. भाग्यवान क्रमांक : 10, शुभ रंग: निळा


मिथुन (Gemini)


दिवस काहीसा तणावात जाऊ शकतो. नातेवाईकांचे सहकार्य खूप फायदेशीर ठरू शकते. तुमचा स्वभाव तुम्हाला चिडखोर बनवू शकतो. याचा परिणाम तुमच्या व्यावसायावर होऊ शकतो. नवीन नोकरी सोडण्याचा विचार करू शकता. प्रेमप्रकरणात वैवाहिक मतभेद होतील. धूम्रपान टाळा आणि सावध रहा. भाग्यवान क्रमांक: 18, शुभ रंग: हिरवा


कर्क (Cancer)


ज्या गोष्टी तुम्ही टाळत असाल तेच विचार तुमच्या डोक्यात येतील. मानसिक तणाव जाणवेल.  व्यावसायिकदृष्ट्या, येणाऱ्या ग्राहकांना फायदा होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. भाग्यवान क्रमांक: 06, शुभ रंग: लाल


सिंह (Leo)


रागावर नियंत्रण ठेवा. पगारवाढ किंवा इतर बाबींबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. लग्नाचा योग जुळून येवू शकतो. कामात व्यस्त असल्यामुळे तणाव येऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. भाग्यवान क्रमांक: 16, शुभ रंग: नारिंगी


कन्या (Virgo)


आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिवस त्रासदायक ठरू शकतो. वकील आणि इतर व्यावसायिकांसाठी आजचा दिवस कठीण जाईल. उत्पन्न किंवा मालमत्तेसंबधीत व्यवहार करु नका. मुलांचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. भाग्यवान क्रमांक : 9, शुभ रंग: राखाडी


तूळ (Libra)


सांधे दुखीचा त्रास होऊ शकतो. रोमँटिक जीवनात अद्भुत अनुभव येऊ शकतो. व्यवसायात पार्टनर मिळू शकतो. भाग्यवान क्रमांक : 13, शुभ रंग : तपकिरी


वृश्चिक (Scorpio)


आर्थिक स्थिती स्थिर सुधारेल. वायफळ खर्च टाळा. व्यावसायिक जीवनात यश मिळू शकते. नवीन नातेसंबंध जोडण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. भाग्यवान क्रमांक: 13, शुभ रंग: पिवळा


धनु (Sagittarius)


अद्भुत आणि संस्मरणीय अनुभव येतील. मालमत्ता खरेदी करण्याचा व्यवहार फेल ठरु शकतो. आर्थिक संकटात येवू शकतो. जोडीदार अडचणीत येवू शकतो त्याला मदत करा. भाग्यवान क्रमांक : 16, शुभ रंग: पांढरा


मकर (Capricorn)


दिवस अत्यंत आनंददायी ठरु शकतो. बऱ्याच काळापासून त्रास होत असलेला विषय संपू शकतो. गुरूचा अशुभ प्रभाव तुमच्यावर नकारात्मक परिणाम करेल. तुमच्या मुलांची विशेष काळजी घ्या. भाग्यवान क्रमांक : 10, शुभ रंग: जांभळा


कुंभ (Aquarius)


दिवस तुमच्यासाठी कठीण असेल. व्यवसाय आणि कलात्मक प्रयत्न आकर्षित करतील. देवी लक्ष्मीची कृपा होईल. नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा चांगला असणार आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळले. हेल्थकेअर आणि कपडे उद्योग या दोन्हीसाठी उत्तम दिवस आहे. भाग्यवान क्रमांक: 17, शुभ रंग: क्रीम


मीन (Pisces)


कठोर परिश्रम घ्यावे लागतील. घरगुती त्रासांमुळे व्यवसायावर परिणाम होईल. दिवस वाईट जाईल. व्यवसाय सुरू करायचा असेल तर भागीदार शोधा. कुटुंबाकडून खूप मदत मिळेल. भाग्यवान क्रमांक: 09, शुभ रंग: गुलाबी