आजचे राशीभविष्य | बुधवार | १० एप्रिल २०१९
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. नवीन कामाची सुरूवात होऊ शकते, योजलेली कामं पूर्ण होऊ शकतात. संपत्तीच्या कामांकडे लक्ष द्या. आजचा दिवस कुटुंबासोबत आणि पैशांसंबंधी बाबतीत व्यतीत होईल. महत्त्वाच्या कामांची योजना आखू शकता. जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीच्या बाबतीत सावद राहा.
वृषभ - नकारात्मक कामात अडकाल तर महत्त्वाची संधी गमावू शकता. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दिवसभर सावध राहा. विचार करून बोला. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वाहन चालवताना सावध राहा. तब्येत ठीक राहील.
मिथुन - नवीन काम समोर येऊ शकते. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. एखादी नवीन ऑफर मिळू शकते. योजलेली कामं सुरू केल्यास लवकर पूर्ण होतील. आज दररोजच्या कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत. महत्त्वाची कामं करण्यास दिवस शुभ आहे.
कर्क - प्रेमप्रकरणात गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करू नका. नोकरी, व्यवसायात घाई-गडबड करू नका. कामं पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. अधिक मेहनत घ्यावी लागेल. तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका.
सिंह - विचार केलेली कामं पूर्ण होणार नाहीत. मनात अनेक विचारांमुळे गोंधळ होईल. पैसे सांभाळून ठेवा. गुंतवणूकीच्या बाबतीत विचार करून निर्णय घ्या. कोणतीही योजना आज आखू नका. कामात मन न लागल्याने समस्या वाढतील. तब्येतीसाठी दिवस चांगला आहे.
कन्या - व्यवसायात नवीन कामांची सुरूवात होऊ शकते. जोडीदाराकडून मदत मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. विचार केलेली कामं पूर्ण होतील. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. कामात लक्ष द्या. मन प्रसन्न राहील. तब्येत चांगली राहील.
तुळ - दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेत तुमची कामं पूर्ण करू शकता. कामात मन लागेल. अचानक चांगल्या संधी मिळू शकतात. त्याचा फायदा घ्या. अचानक मनात आलेले विचार फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबत संबंध अनुकूल राहतील.
वृश्चिक - नोकरी, व्यवसायात निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होऊ शकते. गोंधळ वाढेल. वायफळ कर्च होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील. समस्या असल्यास त्या सावधतेने सोडवा. तब्येतीत चढ-उतार येऊ शकतात.
धनु - आर्थिक समस्या सोडवल्या जातील. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. नम्रतेने समस्या सोडवू शकता. धनलाभाचा योग आहे. एखादी मोठी समस्या सुटू शकते. मुलांकडून मदत मिळेल. नवीन लोकांशी ओळख होईल. नोकरी, व्यवसायातील अडथळे संपतील. तब्येतीच्या बाबतीत सावध राहावे लागेल.
मकर - काही लोकं स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासमोर समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. मनात अनेक विचारांनी गोंधळ होईल. जुन्या गोष्टीमध्ये अडकून राहाल. कोणतीही समस्या सहजा-सहजी सुटणार नाही. कामात मन लागणार नाही. महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते.
कुंभ - ऑफिसमध्ये स्वत:वर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या संपतील. योजना सफल होतील. पुढील कामांसाठी योजना आखण्यास दिवस चांगला आहे. तब्येतीची काळजी घ्या. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे.
मीन - व्यवसायात काही नवं करण्याच्या नादात समस्या वाढू शकतात. मनातील अनेक विचारांमुळे कामात मन लागणार नाही. नोकरी, व्यवसायात घाई करू नका. व्यावसायिक जीवनात टेंन्शन वाढू शकते. केलेल्या कामाचा रिजल्ट न आल्यास ताण घेऊ नका. तब्येतीसाठी दिवस चांगला नाही. जेवण वेळेवर करा.