Horoscope Today 19 June : या राशीच्या व्यक्तींनी अनोळखींवर आज विश्वास ठेऊ नका!
दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मुंबई : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आह. विवाहासाठी इच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगलं स्थळ मिळेल. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे.
वृषभ
आजच्या दिवशी तुमचं उत्पन्न स्थिर राहील. मात्र कोणताही धोका पत्करू नका. दरम्यान आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे.
मिथुन
या राशीच्या व्यक्तींना आज नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. मात्र कोणत्याही प्रकारची घाई करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होऊ शकतं.
कर्क
शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी आजचा चांगला दिवस नाही. काही कारणामुळे प्रवासाचा योग आहे.
सिंह
आजच्या दिवशी तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवी दारं उघडण्याची शक्यता आहे. घरात प्रसन्न वातावरण राहील.
कन्या
आजच्या दिवशी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवहार करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल.
तूळ
आजच्या दिवशी कोणताही धोका पत्करू नका, रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
आजच्या दिवशी उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शिवाय व्यवसायात उत्पन्न वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.
धनू
या राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवश उत्तम आहे. कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होण्यास आज मदत होईल.
मकर
नोकरीच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळण्यास मदत होईल. कुठलीतरी चिंता जाणवेल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.
कुंभ
आजच्या दिवशी व्यवहार पूर्ण होतील शिवाय याचा फायदा होईल. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.
मीन
आजच्या दिवशी मनावर सत ताण राहील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज व्यस्त राहू शकता. विनाकारण खर्च वाढतील.