मुंबई : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित आजच्या दिवशी तुमचे तारे अनुकूल आहेत की नाही हे आजचं राशीभविष्य तुम्हाला सांगणार आहे. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं आहे. 


मेष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाची कामं आज रखडण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना काळजी घ्या, अपघाताचा योग आहेत. नशीबावर विश्वास ठेवा.


मिथुन


कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. आज घरी पाहुणे येण्याचा योग आहेत. त्याचसोबत कौटुंबीक वाद संपुष्टात येतील.


कर्क


आजचा दिवस खूप त्रासदायक राहण्याची शक्यता आहे. इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करा. बाहेरचे खाणं-पिणं टाळा.


सिंह 


आज दुपारपर्यंत तुमची महत्त्वाची सर्व कामं उरकून घ्या. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कोणालाही दुखवू नका.


कन्या 


आज व्यापारात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. शिवाय आजच्या दिवशी उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील. गरजूंना अन्नदान करा.


तूळ


या राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी बक्षीस, पुरस्कार मिळण्याचे योग आहेत. घरातील वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. दिलेलं वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक 


व्यापार आणि व्यवसायात यश मिळणार आहे. घरी आलेल्या पाहुण्यासोबत वाद घालू नका. घरातील पश्चिम दिशेला स्वच्छता ठेवा.


धनु 


कुटुंबातीस कलह तसंच क्लेश आज संपुष्टात येणार आहे. उधार दिला पैसा परत मिळण्याची शक्यता कमीच आहे. रखडलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.


मकर 


या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. नात्यातील कडवटपणा दूर होईल. 


कुंभ 


थोरा-मोठ्यांचा मान-सन्मान ठेवायला विसरू नका. संध्याकाळपर्यंत अनुकूल योग आहे. व्यापारात अडकलेला पैसा मिळेल मात्र त्यासाठी तडजोड करावी लागेल.


मीन 


कामावर जाताना वेळेत घराबाहेर पडा. गरजू व्यक्तीला आजच्या दिवशी मदत करा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.