Horoscope 09 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. वायफळ खर्च करू नका. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी नवीन भेटी होऊ शकतात. महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत बदल होऊ शकतो.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी  तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही घरातील सदस्यांशी बसून चर्चा कराल. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी वेळेचा पुरेपूर वापर करावा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देण्याचे वचन देऊ शकता.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी पैशाबाबत मनात अनेक प्रकारचे विचार येऊ शकतात. अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना बनवू शकता.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. तरुण करिअरमध्ये चांगले पर्याय शोधतील. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी आर्थिक संकट टाळण्यासाठी वायफळ खर्च थांबवावा लागेल. आपत्कालीन कामाच्या आगमनामुळे, नियोजित योजनांमध्ये बदल होऊ शकतो. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी लोकांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखू नका. नफा मिळवण्याच्या नादात चुकीच्या पद्धतींचा अवलंब करू नका.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )