मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तसंच वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. 


वृषभ


आजच्या दिवशी नात्यातील कडवटपणा दूर होईल. मात्र इतरांशी बोलताना सांभाळून बोला. 


मिथुन


तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात. भाग्य तुम्हाला नक्की साथ देईल. मित्र आणि ओळखीच्यांबरोबर चांगला काळ जाईल.


कर्क


या राशीच्या लोकांचा दिवस चांगला सुरू होईल. मनामध्ये सकारात्मक विचार येतील. कामात चांगले पैसे मिळतील. तुमचं कार्य कुशलतेने पूर्ण कराल आणि त्यामध्ये यशस्वी व्हाल.


सिंह


दिवस फार चांगला जाणार नाही. संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटूंबाचा पाठिंबा मिळेल. म्हणून धीर सोडू नका आणि पुढील कठीण परिस्थितीचा सामना करा. वडिलांकडून योग्य मार्गदर्शन नक्की घ्या.


कन्या


कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणींपासून मुक्त होऊ शकता. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल. तुम्हाला काही भेटवस्तू मिळणार आहे. कठोर परिश्रम, समर्पण हे कामाच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल. परिणामी, क्षेत्रात चांगले यश मिळेल.


तुला


तुमचा दिवस खूप खास असेल. तुमच्या मनात जर काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबद्दल अधिक सखोल विचार करण्याची गरज आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.


वृश्चिक 


एखाद्या अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळू शकतात. नवीन प्रकल्पात काम करून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल. युवकांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी आहेत. आई-वडिलांसोबत खरेदीला जाऊ शकता.


धनू


नवीन कामात मन लागेल. तुमचं सामर्थ्य आणि धैर्याच्या बळावर पैसे कमावण्यात सक्षम व्हाल. करियरशी संबंधित नवीन माहिती युवकांना मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच विवाद उद्भवू शकतात. अनावश्यक अडचणींवर नियंत्रण ठेवलं जाईल.


मकर


मनामध्ये चांगल्या भावना येतील.कामाच्या संबंधात तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील. आयटी उद्योगाशी संबंधित लोकांसाठी हा चांगला काळ आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे.


कुंभ


आजचा दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असू शकतो. कमी प्रयत्नाने तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित मित्राच्या मदतीने तुम्ही प्रगती करू शकता. आज तुमचा बॉस तुम्हाला प्रोत्साहित करेल.


मीन


कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.