Horoscope 11 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी नव्या व्यक्तींना भेटण्याचे योग आहेत. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी इतरांकडून आदर मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती असल्यास ती परिस्थिती निभावून न्या. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी चतुराईनं कामं पूर्णत्वास न्या. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील. तुम्ही आखलेले बेत गुलदस्त्यात ठेवा. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक चणचण संपुष्टात येईल. व्यवसायात फायदा होणार आहे.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी काही लोक तुमच्याकडून काम काढून घेण्याचा प्रयत्न करतील. मनातली प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनसाथीजवळ व्यक्त करा. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील. कित्येक विचारांनी तुमच्या डोक्यात घोळ घातला असू शकतो.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क साधावा. अधिक मेहनत करा यश अटळ आहे. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक करण्याची उमेद आहे. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त काळजी करू नका. काही चांगल्या योजना कराल ज्याचा आगामी काळात फायदा होईल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी आपण संयम ठेवल्यास यश मिळू शकते. खर्चाच्या बाबतीत आपले मन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी जोडीदाराचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करा. कोर्ट-कचेरीसंबंधित काम वेळेत पूर्ण होणार नाहीत.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )