मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी घर दुरुस्ती आणि सजावट महत्त्वाचं काम असू शकतं. काही वेळा काही कामात अपेक्षित परिणाम न मिळाल्याने अस्वस्थ व्हाल. चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. अनावश्यक खर्च करू नका.


वृषभ


आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. अनेक कामं मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. उद्योजकांना नवीन सहकारी मिळतील. जिवनसाथीकडून सप्राईज मिळू शकते. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असेल. वृद्धांनी प्रवास टाळावा


मिथुन


व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आरोग्य कमजोर राहू शकतं. काहींना नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. तर जवळच्या व्यक्तीसोबत अचानक समस्या उद्भवू शकतात. 


कर्क 


या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद होण्याची चिन्ह आहे. आनंददायी प्रवासाची शक्यता वर्तवण्यात येतेय. पिवळा रंग आज शुभ आहे.


सिंह


राजकारणामध्ये आज प्रगती होण्याची शक्यता आहे. शिक्षणात यश मिळू शकतं. कौटुंबिक निर्णयाबाबत तुम्ही संभ्रमात राहाल. निळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल.


कन्या


नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कन्या आणि मकर राशीच्या मित्रांची आज साथ लाभणार आहे. पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. लाल रंग आजसाठी शुभ आहे.


तूळ


या राशीच्या व्यक्ती आज धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी हिरवा रंग शुभ असून तांदूळ दान करा.


वृश्चिक


कुटुंबाबाबत काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत. हिरवा आणि निळा रंग आज शुभ ठरू शकतो.


धनु


उपजिवीकेसाठी नवं साधन मिळणार आहे. आज तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाची बरसात होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.


मकर


लोकांच्या कामाबद्दल प्रामाणिकपणा आणि समर्पण त्यांना आर्थिक बाबतीत निराश होऊ देणार नाही. सध्याचा काळ हा तुमचा व्यवसाय वाढवण्याचा आहे, या विषयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि प्रमोशनचाही वापर करा.


कुंभ


या राशीचे लोक ज्या कंपनीत काम करतात, त्यांना कंपनीकडून चांगलं प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. दूरसंचाराचे काम करणाऱ्या व्यावसायिकांना फायदा होईल. त्यांनी त्यांच्या व्यवसायातील साठा पाहावा. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेऊ नका, 


मीन


आज घरी पाहुण्यांची रिघ असणार आहे. आनंद घ्या या दिवसाचा. जुन्या मित्रांचीही भेट घडणार आहे. एखादी छान भेटवस्तू मिळणार आहे.