Horoscope 12 July 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला अनपेक्षित धन होण्याची शक्यता आहे. नोकरीत सकारात्मक परिणाम दिसणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत गवसणार आहे. चिंता दूर होईल. 


वृषभ (Taurus Zodiac) 


आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहारात घाई न करणे हिताच ठरेल. थकवा आणि अशक्तपणा जाणवणार आहे. प्रेमप्रकरणात अनुकूलता असणार आहे. राजकीय अडथळे दूर झाल्यानंतर परिस्थिती अनुकूल असणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. प्रवासात घाई करुन चालणार नाही. शारीरिक त्रास होणार असून जुना आजार पुन्हा त्रासदायक ठरेल. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना काळजी घ्या. व्यवसायियांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. उत्पन्नात निश्चितता राहणार आहे.


कर्क (Cancer Zodiac)   


आजचा दिवस संमिश्र असणार आहे. धर्म आणि कामात रुची वाढणार आहे. कोर्टाच्या कामातून अपेक्षित लाभ मिळणार आहे. काही मोठ्या कामातील अडथळे दूर होणार आहेत. कौटुंबिक सहकार्य लाभणार आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नवीन योजना आखली जाणार आहे. कामकाजात सुधारणा होणार आहे. मानसन्मान वाढणार आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड इत्यादींकडून लाभ होणार आहे. प्रेमप्रकरणात घाई करू नका. 


कन्या (Virgo Zodiac)    


आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होणार आहे. लाभाच्या संधी निर्माण होणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. नोकरीत अनुकूलता असणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. चिंता आणि तणाव वाटणार आहे. 


तूळ (Libra Zodiac)  


आजचा दिवस संमिश्र असणार आहे. अनपेक्षित खर्च वाढणार आहे. वादामुळे स्वाभिमान दुखावला जाणार आहे. जुना आजार पुन्हा बळावणार आहे. धोकादायक आणि जोखमीची कामं टाळा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


आजचा दिवस कठोर परिश्रम सोडून इतर सर्व विषयांमध्ये चांगला असणार आहे. अनपेक्षित लाभ होणार आहे. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होणार आहे. गुंतवणूक इच्छेनुसार होणार आहे. घराच्या आत आणि बाहेर आनंदाचे वातावरण असणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac) 


आजचा दिवस संमिश्र असणार आहे. दूरवरून चांगली बातमी कानावर पडणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. धोका पत्करण्याचे धाडस आज करु नका. घरी पाहुण्यांचे आगमन होणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार आहे. 


मकर (Capricorn Zodiac)   


आजचा दिवस अनुकूल असणार आहे. प्रयत्नांना यश मिळणार आहे. सामाजिक कार्य करण्याची संधी लाभणार आहे. मानसन्मान तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला नसणार आहे. तुम्हाला आज दु:खद बातमी मिळण्याची शक्यता आहे. भाषणात सौम्य शब्द वापरणे टाळा. राग आणि उत्साहावर नियंत्रण ठेवा. जुना आजार पुन्हा त्रासदायक ठरणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac)  


आजचा दिवस चांगला असणार आहे. पार्टी किंवा पिकनिकचे बेत आखणार आहे. आपण स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेणार आहे. विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )