Horoscope 12 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी व्यवसायात मनासारखा नफा मिळणार नाही. तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. राजकारणातही चांगली संधी आहे. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या. मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आज त्यावर पैसे खर्च करणे टाळा. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतेत असाल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी सामाजिक कार्य करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल आणि तुमचा सन्मानही वाढेल. अभ्यास करताना एकाग्रतेचा अभाव असू शकतो.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना रखडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराबरोबर काही वाद होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये आधीच पैसे गुंतवले असतील तर नुकसान होऊ शकतं.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वादविवाद जास्त वाढू देऊ नका. तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.  तुम्हाला तुमच्या व्यवसायात एखादे मोठे काम मिळू शकते.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा घर इत्यादी खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )