मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी नोकरी बदलण्याचे योग आहेत. खाण्या-पिण्याबाबत काळजी घ्या. देण्या-घेण्याचे व्यवहार शक्यतो टाळा


वृषभ


आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. वेळेचा उपयोग कराल.


मिथुन


मुलांकडून आनंदी बातमी समजेल. आज नोकरी- व्यवसायात प्रगती साधाल. नाते-संबंधात सुधारणा होईल.


कर्क


आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. 


सिंह


दिवस स्फुर्तीने भरलेला असेल. परिश्रमाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आनंद प्रसन्न राहील. प्रेम संबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे.


कन्या


तुमच्यात आज उत्साह भरपूर असेल. नशीब तुमच्या बरोबर आहे, कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. आज तुमचा मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट होईल, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.


तुला


तुम्ही दिवसभर फ्रेश राहू रहाल त्याचप्रमाणे नोकरीमध्ये यश मिळेल. व्यवसायात देखील फायदा होईल. नव्या नोकरीच्या संधी मिळतील शुक्रवारी चपळाईने तुम्ही तुमची प्रत्येक कामं अगदी सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षेत तसंच स्पर्धेत यश मिळेल.


वृश्चिक


भाग्य तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. इतरांशी तुमचं बोलणं गोड असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल. आपण आपल्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी कराल.


धनु


आजच्या दिवशी आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे मात्र विनाकारण वादामध्ये पडू नका. आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा.


मकर


सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.


कुंभ


स्वतःवर विश्वास ठेवा.अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. आरोग्यावर लक्ष द्या. 


मीन


संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरातील महत्त्वाच्या कामात मदत करा. वायफळ खर्च करू नका. आरोग्याची काळजी घ्या.