Horoscope 13 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. प्रकृती दिवसभर थोडी कमजोर राहिल्याने तुम्ही आळस येईल. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवून आजचा दिवस शांततेत घालवणे फायदेशीर ठरेल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी आर्थिक किंवा अन्य लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाच्या प्रगतीची बातमी मिळेल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अधूनमधून पैशाची आवक होईल. व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी अनावश्यक वाद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावर अनपेक्षित खर्च होईल.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी अडकलेले पैसे मिळाल्यावर तुमचे मन प्रसन्न होईल. दिवसाचा पहिला भाग तुम्ही आनंदाने आणि शांततेत घालवाल.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींचा कामाच्या ठिकाणी गोंधळ होईल. निष्काळजीपणामुळे महत्त्वाचे व्यवहार गमावण्याचीही शक्यता आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी तुमचे अधिकारी तुमच्यावर खूश असतील. तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दलही तुम्ही आनंदी असाल. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. जीवनातील कोणत्याही विशेष बदलाबद्दल विचार करू शकता.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कुटुंबाच्या कोणत्याही बाबतीत बाहेरच्या व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. व्यवसायात तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी वादविवाद होत असलेल्या कोणत्याही परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवा. तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात.   


मीन (Pisces)


आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबातील कोणाशीही तुमच्या लग्नाबद्दल बोलू शकता. काही नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ शकतात 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )