Horoscope 15 January 2024 : सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तो उत्साह म्हणजे मकर संक्रांत. आज देशभरात मकर संक्रांत साजरी करण्यात येणार आहे. सण असलेला आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक असतो. त्याची जरादेखील कल्पना मिळाली की, आपण सावधपूर्ण पाऊलं टाकतो. मग आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या आजचं राशीभविष्य 


मेष (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल. वेळेत काम करुन तुम्ही घरी लवकर जाल. जुन्या सहकाऱ्याची भेट आनंददायी असेल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल. 


वृषभ (Taurus Zodiac) 


नशिबाची साथ मिळणार आहे. उत्पन्नाचे स्त्रोत गवसणार आहे. इतर दिवसांच्या तुलनेत दिवस अधिक लाभदायक असणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


घाईघाई कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. 


कर्क (Cancer Zodiac)   


वैयक्तिक कामात जास्त पैसा खर्च होईल. अनुभवी व्यक्तीकडून कामात मदत होणार आहे. जोडीदारासोबतच नातं खूप भावूक असणार आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


नोकरदार लोकांना चांगली बातमी मिळणार आहे. कामामध्ये समन्वय ठेवा. तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. 


कन्या (Virgo Zodiac)   


शत्रूंपासून आराम मिळेल. आर्थिक लाभाची संधी आहे. कामाच्या ठिकाणी थोडा ताण असणार आहे. कौटुंबिक वातावरण चांगल असणार आहे. 


तूळ (Libra Zodiac)  


कामाच्या ठिकाणी इतरांची मदत मिळणार आहे. आजचा दिवस आनंदाचे क्षण अनुभवणार आहात. प्रेमसंबंध अधिक घट्ट होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)  


तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.  ऑफिसमध्ये वाद टाळा. गैरसमजूतीला वाव देऊ नका. 


धनु (Sagittarius Zodiac) 


आज परिश्रम करावे लागणार आहे. कामात हवं तसं यश मिळणार नाही. परिस्थितीशी दोन हात करावा लागू शकतो. 


मकर (Capricorn Zodiac) 


कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदी असणार आहे. तुमची सर्व प्रशंसा करणार आहे. घरात शुभ कार्य ठरणार आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


कामाच्या वेग आज वाढणार आहे. बाहेरील वादांपासून स्वत:ला दूर ठेवा. आज तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल. तुमच्यामध्ये आज वेगळाच उत्साह दिसून येईल.


मीन (Pisces Zodiac)


ऑफिसमध्ये वाद झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ असणार आहात. डोळ्यांची विशेष काळजी घ्या. खर्चात वाढ होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)