Horoscope 2 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी इतरांचा तुमच्याप्रती असणारा दृष्टीकोन सकारात्मक असेल. कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या क्षेत्रात तडजोड करावी लागू शकते. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. जुन्या गोष्टी आणि आठवणी विसरण्याचा प्रयत्न करा.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी अशा काही व्यक्तींची भेट घडू शकते, ज्यांचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम असेल. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत बाहेर फिरण्यासाठी जाण्याचा य़ोग आहे. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी चांगल्या वागणुकीमुळे तुम्हीच यशस्ली होणार नाहीत. कामाच्या ठिकाणी काही नव्या गोष्टी शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल.  


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होईल. काही महत्त्वाच्या बदलांना आजपासून सुरुवात होईल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीची चिंता करु नये. एखादी शुभवार्ता मिळेल. एखाद्या योजनेचा फायदा होईल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी एखादं खास काम कुटुंबाच्याच मदतीने पूर्ण कराल. मित्रांच्या मदतीने अडचणीतून बाहेर येण्याची संधी आहे. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी जवळपासच्या किंवा खास लोकांना तुमची गरज लागेल. कामाच्या संदर्भात प्रवास होण्याची शक्यता आहे. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी काही गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने होतील. परिवार आणि आवडत्या व्यक्तींवर खर्च करण्याचा विचारही करु शकता.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी ज्या गोष्टी तुमच्यासाठी वास्तवात गरजेच्या असतील त्यांना प्राधान्य द्याल. कोणती तरी आनंदाची बातमी मिळू शकते.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कोणत्या सहकार्यासोबत मिळून केलेले काम यशस्वी होईल. विवाह प्रस्ताव देखील येण्याचे योग आहेत.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )