Horoscope 2 March 2024 : `या` राशीच्या व्यक्तींना जुन्या समस्यांमधून मुक्ती मिळू शकते!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Horoscope 2 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी खिशानुसारच पैसे खर्च करा. तुम्ही एखाद्या जुनाट आजाराला बळी पडू शकता.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात आनंददायी परिणाम मिळतील.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद टाळा. आरोग्याबाबत सावध राहा, खर्च वाढू शकतो.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी व्यवसायात सुधारणा होईल, परंतु काही अडचणी देखील येऊ शकतात. बौद्धिक कार्यातून उत्पन्न वाढेल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी वैवाहिक सुखात वाढ होईल. तुमच्या नोकरीत अधिकार्यांचे सहकार्य मिळेल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुम्हाला जुन्या चुकीबद्दल तुम्हाला पश्चाताप होईल. तुम्ही आधी एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना अचानक फायदा होऊ शकतो. वेळेवर सहकार्य नसल्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली बातमी मिळणार आहे. जुन्या समस्यांमधून मुक्तता मिळणार आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी कुटुंबासमवेत धार्मिक स्थळी जाण्याचे बेत आखले जातील. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी वैवाहिक जीवनात कोणासही बोलताना विचारपूर्वक बोलावं. मित्रासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी कोणतीही गुंतवणूक तुम्ही विचारपूर्वक करा. आजचा दिवस नोकरीच्या दृष्टीने चांगला जाणार आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी न्यायालयाशी संबंधित कोणत्याही प्रकरणामध्ये तुम्हाला तुमचे मत उघडपणे मांडावे लागेल. तुम्हाला कोणालाही पैसे उधार देणे टाळावे लागेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )