Horoscope 20 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी नव्या लोकांची भेट घडण्याचा योग आहे. नोकरदार वर्गाची परिस्थिती सुधारेल.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. मोठी कामं आटोपण्यावरच तुमचं लक्ष असणार आहे.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी भावना व्यक्त केल्यास समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचतील. काही खास व्यक्ती तुमचं काम पाहून दाद देतील.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी जवळपासच्या व्यक्तींवर लक्ष द्या. जास्तीत जास्त कामांमध्ये तुम्ही यशस्वी ठराल. स्वत:वर विश्वास ठेवा. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी विचारांमध्ये सकारात्मक बदल होतील. विचार केलेली कामं पूर्ण होतील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुमची विचार करण्याची पद्धत इतरांना आवडेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस सामान्य आहे. कोणतीही हाती आलेली संधी सोडू नका.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या मनाप्रमाणे नसल्याने, मूड खराब होऊ शकतो. एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकू शकता.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी बऱ्याच काळापासून बेत आखत होतात अशी सर्व कामं पूर्ण होतील. नव्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी नव्या व्यक्तींशी ऑनलाईन गप्पा झाल्यामुळे उत्साह वाढेल. लोकांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येईल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )