Horoscope 20 November : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष


या राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचा असू शकतो. व्यवसायातील कामात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे जा यशस्वी रहाल.


वृषभ


आज तुम्हाला तुमचं वागणं संतुलित ठेवलं पाहिजे. दागिने तसंच कपडे खरेदी करायला जाऊ शकता. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी आहे.


मिथुन


आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. धातूचा व्यवसाय करणार्‍यांसाठी वेळ चांगला असू शकतो. तुमच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.


कर्क


आजच्या दिवशी घरातून निघताना गोड खाऊन निघा. व्यापारी आणि विक्रेत्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्या.


सिंह 


वडीलधाऱ्यांकडून आदर तसंच सहकार्य पूर्णपणे प्राप्त होईल. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा तीव्र होण्याची शक्यता आहे.


कन्या


आजच्या दिवशी आर्थिक परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभव महत्वाचा आहे त्यामुळे पुन्हा होणाऱ्या चुका टाळा. 


तूळ


आजच्या दिवशी मन प्रसन्न राहील. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात चांगला फायदा होईल.


वृश्चिक


आजच्या दिवशी नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह दाखवा. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळणार आहे. तुमचा मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट होऊ शकते.


धनु 


आजच्या दिवशी तुम्ही कामाच्या ठिकाणी अडचणींपासून मुक्त होऊ शकता. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.


मकर


या राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये बँकिंग क्षेत्राच्या लोकांना नफ्याचा काळ असणार आहे. पेंडिंग ठेवलेली प्रॉपर्टी डील फायदेशीर वाटू शकेल.


कुंभ


वेळेचा योग्य वापर केल्याने तुमचा फायदा होणार आहे. खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


मीन


महिलांनी त्यांच्या करिअरबद्दल जास्त विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.