Horoscope 20 November 2023 : `या` राशीच्या व्यक्तींची ठरवलेली कामं पूर्ण होतील!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Horoscope 20 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी आत्मविश्वास आणि स्फूर्तिच्या जोरावर चांगला फायदा मिळवाल. नवे उपक्रम हाती घेण्यासाठी ही योग्य वेळ आणि काळ आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी तुम्ही व्यवसायासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. हुशारीच्या जोरावर कुटुंबियांकडून मदत प्राप्त कराल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी व्यापाराचा विस्तार होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कार्यालयात वरिष्ठ आणि सहकाऱ्यांना स्वत:कडे आकर्षित कराल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी प्रशासनाशी संबंधित कामे सहज होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. सासरच्यांकडून चांगली बातमी मिळेल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील. सध्याच्या परिस्थितीमुळे व्यावसायिक क्रियाकलाप कमकुवत राहतील.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी जास्त खर्च केल्यामुळे पार्टनरसोबत विवाद होऊ शकतो. कोणा एका नव्या स्थानावर भेट देण्यासाठी जाण्याची संधी मिळेल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कोणाचं मन दुःखवू नका. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी अधिकाधिक गोष्टींमध्ये यशस्वी व्हाल. अडचणींवर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळेल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी प्रेम आणि व्यवसाय पूर्वीपेक्षा खूप चांगला आहे. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी मोठे बदल होऊ शकतात. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी पैसे योग्य आणि गरजेच्या वस्तूंवर खर्च होतील. अपेक्षेप्रमाणे तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण होतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )