Horoscope 21 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे बढती व बदली होण्याचे योग आहेत. सरळमार्गी मिळणाऱ्या पैशाला महत्व द्यावं लागेल. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी प्रवासातून लाभ होणार आहेत. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहणार आहे. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध राहावं लागणार आहे. कोणासोबतंही आज होणारे कलह टाळावेत. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी मुलांच्या कामावर नजर ठेवण्याची वेळ येऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष बिलकूल करू नका.


सिंह (Leo)


आजचा दिवशी पत्नीकडून तुम्हाला अपेक्षेप्रमाणे सहकार्य लाभणार आहे. तुमच्या बिझनेसमध्ये विस्तार वाढ होण्याची शक्यता आहे. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होऊ शकतात. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी भावडांशी वादविवाद टाळावेत. एखादी मोठी आणि महत्त्वाची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार मनातून काढून टाका. पैशांसंबंधीत काही गोष्टी सुधाराव्या लागू शकतात. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नाते-संबंधांची नव्यानं सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी नवनवीन कल्पना तुमच्या डोक्यात येतील, त्यावर काम करावं.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कायदेशीर बाबी मार्गी लागू शकणार आहेत. एखादी खास जबाबदारी तुमच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी बऱ्याच दिवसांपासून टाळत असलेला मुद्दा पुढे समोर येऊ शकतो. अचानक एखाद्या जुन्या मित्राकडून तुमची मदत होऊ शकते. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी करिअरमध्ये फायदा होऊन बऱ्याच गोष्टी मनाजोग्या घडणार आहेत. एखादा प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)