Horoscope 21 November : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी तुम्हाला आत्मविश्वासाची कमी भासेल. कोणावरही रागराग करणं टाळा. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून तुम्हाला धनलाभ होणार आहे.


वृषभ


या राशीच्या व्यक्तींच्या आज नोकरीमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसंच तुमच्या संपत्तीचा विस्तार होण्याची शक्यता आहे.


मिथुन


मित्रांच्या सहकार्याने तुमचा बिझनेस मोठा होऊ शकतो. कुटुंबात सुख आणि शांती नांदणार आहे. कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ शकता.


कर्क


कुटुंबामध्ये मोठं धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. कला आणि संगीतात तुमची आवड वाढू शकते. मात्र कपड्यांवर अधिक खर्च होऊ शकतो.


सिंह


आजच्या दिवशी तुमचं मन अशांत होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये आईचं सहकार्य मिळणार आहे. तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या.


कन्या


आजच्या दिवसांत अनियोजित खर्च वाढणार आहे. नोकरीसंबंधी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे.


तूळ


आजच्या दिवशी तुम्ही आळसावलेले राहाल. जोडीदारासोबत तुमचं संबंध बिघडू शकतात. नोकरीच्या ठिकाणी अधिक काम करावं लागू शकतं.


वृश्चिक


तुमच्यात आज आत्मविश्वास कमी असेल मात्र कुटुंबाची साथ मिळणार आहे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत तुम्ही सावध रहा. जुन्या मित्रांची भेट होणार आहे.


धनू


आजच्या दिवशी तुम्ही कोणत्या तरी धार्मिक कार्यमामध्ये सहभागी होऊ शकता. संपत्तीमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे.


मकर


या राशीच्या व्यक्तींमध्ये आज आत्मविश्वासाची कमी नसेल. जोडादाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कामामध्ये भाऊ किंवा बहिणीचं सहकार्य मिळेल.


कुंभ


आजच्या दिवशी इतरांशी बोलताना नम्रतेने बोला. आईसोबत मतभेद होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे.


मीन


आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.