Horoscope 22 April 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. आज अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीया हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. तर आजचा हा तुमचा दिवस कसा जाईल याची माहिती घेऊया. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी मेहनत करून यश प्राप्त होणार आहे. तुम्हाला गरजेच्या असलेल्या कामात तुमचे मित्र तुम्हाला मदत करणार आहेत.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नोकरीत अतिरिक्त जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळणार आहेत.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी अचानक तुम्गाला चांगली बातमी मिळू शकणार आहे. संततीसाठी आजचा हा शुभ दिवस आहे.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी मोठं काम करण्याची संधी मिळणार आहे. मित्राकडून व्यवसायाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. 


सिंह (Leo)


आजचा दिवशी कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू शकतो. रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तसंच वैवाहिक सुखात वाढ होणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी आज त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी कुटूंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. कामकाजाची परिस्थिती उत्तम राहणार आहे. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनाजोग्या गोष्टी घडतील. व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी घरातील वातावरण बिघणार नाही हे पाहावं. लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागू शकतात. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी लागणार आहे. कायदेशीर बाबीत कठीण पेचप्रसंगात गुंतले जाऊ शकता.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी व्यवसायात धाडसी निर्णय घेणार आहात. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)