Horoscope 24 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तब्येतीत सुधारणा होऊ शकते. अनेक दिवसांपासून असलेल्या तब्येतीच्या तक्रारी काहीशा कमी होतील.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी जे काम हाती घ्याल त्या कामात महत्त्वाची मदत मिळेल. अचानक घडलेल्या कोणत्याही घटनेवर लगेच निर्णय घेऊ नका.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी  नुकसान होऊ शकतं. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. व्यवसायात काही नवं केल्यास यश मिळेल. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी पैसे आणि कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराच्या वागण्यामुळे दु:खी होऊ शकता. तब्येतीची काळजी घ्या.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी जुने वाद संपवण्याचा प्रयत्न कराल. करियरबाबत चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार राहील. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी बॉससोबत असलेल्या तुमच्या संबंधांबाबत सावध राहा. गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी मनाचे समाधान करण्यासाठी पैशांचा अतिवापर करु नये. वेळ मिळेल तर थोडा वेळ स्वत: साठी काढण्याचा प्रयत्न करा. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी तुमची कमाई आणि खर्च समान राहतील. नोकरदार वर्गातील मंडळी कोणत्यातरी निर्णयामध्ये गोंधळलेली असतील.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नव्या व्यवसाय किंवा नोकरीची ऑफर तुम्हाला मिळू शकेल. वरिष्ठांशी बोलणे आणि व्यवसायातील करारामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी व्यवसायात फायदेशीर करार होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या बाजूने असेल. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी बरीचशी अडकलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात राहाल. काही प्रकरणात घाई केलात तर ठरवलेली कामे बिघडण्याची शक्यता आहे. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करण्याच्या दिशेने काम होईल. अविवाहीतांसाठी दिवस चांगला राहील. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )