Horoscope 25 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी मित्र परिवारामधून आर्थिक लाभ होणार आहे. व्यापार व्यवसायातील वातावरण चांगले राहणार आहे.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी बोलण्यामुळे समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होण्याची चिन्ह आहेत. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी आरोग्याशी निगडीत समस्या दूर होण्याची चिन्ह आहेत. या राशीच्या व्यक्तींची नवीन लोकांशी ओळख होऊ शकते.


सिंह (Leo)


आजचा दिवशी अडकलेल्या गोष्टी निकाली लागणार आहेत. महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी नोकरी आणि दिनचर्येत काही बदल होण्याची चिन्हं आहेत. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना योजनांची आखणी आणि विचारसरणीचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षांमध्ये यश मिळेल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बऱ्याच अंशी यशस्वी ठरणार आहात.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी मिळू शकते. नवं काम सुरु करण्याचा विचार मनात येईल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. महत्त्वाची कामं रखडण्याची शक्यता आहे. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कुंटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते. एखाद्या अशा व्यक्तीला भेटाल, ज्याचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम असेल.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कोणतीही संधी गमावू नका. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग दिसून येतायत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)