Horoscope 27 November : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष


शिक्षण आणि व्यापार क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे.


वृषभ


आजच्या दिवशी आरोग्याची जरा जास्त काळजी घ्या. व्यवसायामध्ये तुमची प्रगती होणार आहे. अचनाक धनलाभ होण्याची शक्यता आहे.


मिथुन


विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या करियरमध्ये यश मिळणार आहे. बिझनेसमध्ये नवीन प्रोजेक्टसाठी प्रेरणा मिळणार आहे. गाडी खरेदीचे नियोजन करु शकता.


कर्क


कुटुंबामध्ये आज काही प्रमाणात तणाव जाणवू शकतो. आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. रिअल इस्टेट आणि मीडियाशी संबंधित व्यक्तींसाठी दिवस शुभ राहणार आहे.


सिंह


नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकतं. तुमच्या व्यवसायामध्ये चांगला लाभ मिळेल. 


कन्या


आजच्या दिवसात कोणत्याही कामात नियोजन करणं महत्त्वाचं आहे. शब्द जपून वापरणं तसंच नियम-कायदे पाळणं महत्त्वाचं आहे.


तूळ


आजच्या दिवशी तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवाव्या. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही त्यामुळे विचार सोडा.


वृश्चिक


आजच्या दिवशी तुम्हाला संयम राखणं हिताच आहे. दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. कोणतंही काम करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने वागा.


धनु


आजच्या रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. बक्कळ पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.


मकर


आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. आज कोणताही धोका पत्करू नका. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाऊ शकतो.


कुंभ


शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीचा विचार करू शकता. यामुळे तुम्हाला लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस जाणार आहे.


मीन


आजच्या दिवशी चांगली बातमी कानावर येईल. नोकरीच्या ठिकाणी अतिरीक्त आणि नवीन जवाबदारी मिळू शकते. मन प्रसन्न राहणार आहे.