Horoscope 28 June 2023 : `या` राशीच्या लोकांचं आज नशिब फळफळणार; मिळणार बक्कळ पैसे!
Horoscope 28 June 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
Horoscope 28 June 2023 : 28 जून 2023 रोजी येणारा बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यामुळे आजच्या दिवशी गणेशाची कृपा दृष्टी होवून या राशीच्या लोकांचे नशिब फळफळणार आहे. प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आत्मसंयम गरजेचा आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मात्र, कामाचा ताण वाढेल. उत्पन्न वाढेल.
वृषभ (Taurus)
मनातून अस्वस्थ वाटेल. चढ-उतार असतील. धर्माप्रती भक्ती राहील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. शैक्षणिक कामासाठी इतर ठिकाणी जावे लागू शकते. त्याअनुषंगाने तयारी करावी.
मिथुन (Gemini)
मन अस्वस्थ राहील. संयम ठेवणे कठीण जाईल. वाद विवाद झाल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
कर्क (Cancer)
एखाद्या मोठ्या अडचणीचा सामाना करावा लागू शकतो. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा.व्यवसायात सुधारणा होईल.
सिंह (Leo)
पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकीय खर्च आणि वाहन देखभालीवरील खर्च वाढू शकतो.
कन्या (Virgo)
मन अस्वस्थ होऊ शकते. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाचा विस्तार होईल. भावंडांकडून आर्थिक सहकार्य मिळेल.
तूळ (Libra)
अनावश्यक राग टाळा. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक (Scorpio)
आत्मविश्वासाचा अभाव राहील. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. लाभात घट होऊ शकते.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो.
मकर (Capricorn)
शैक्षणिक कार्यात व्यस्तता वाढेल. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील.
कुंभ (Aquarius)
शैक्षणिक कामात अडचण येण्याची शक्यता आहे. सावध रहा. कुटुंबात धार्मिक कार्य करता येईल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. कुटुंबात धार्मिक कार्य करता येईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )