मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवार तुमच्यासाठी खूप चांगला परिणाम देणारा आहे. इतरांचे सहकार्य मिळणं तुम्हाला सोपं असेल. नवीन कपडे किंवा काही घरगुती वस्तू महिला खरेदी करू शकतात.


वृषभ (Taurus)


शुक्रवारची सकाळची सुरुवात खूप चांगली होईल. नशीब चांगलं असून तुम्ही सर्व कामं उत्तम कराल. नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो.


मिथुन (Gemini)


तुमच्यापैकी काहींना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत.


कर्क (Cancer)


तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते.


सिंह (Leo)


कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टींमुळे तुम्ही संपूर्ण वेळ कामात असाल. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं.


कन्या (Virgo)


राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोकं अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही मिळण्याची शक्यता.


तूळ (Libra)


या शुक्रवारी तुमचं आरोग्य चांगले राहणार आहे. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. तुमचा दिवस पैशांच्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे. याशिवाय तुम्ही पॉलिसी आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता.


वृश्चिक (Scorpio)


या शुक्रवारी तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य साधारणपणे चांगलं राहील. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. याशिवाय पैशाची गुंतवणूक शुभ राहील.


धनू (Sagittarius)


शुक्रवारी तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट समजण्याची शक्यता आहे. नशीब पूर्णपणे तुमच्यासोबत असणार आहे, त्यामुळे तुमच्या वेळेचा चांगला उपयोग करा. अचानक लाभाची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळजी घ्या. 


मकर (Capricorn)


शुक्रवारी कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे खरे किंवा खोटे आरोप देखील लावले जाऊ शकतात. तसंच वादविवादापासून दूर राहणंच योग्य राहील. तुमचं भाग्य चांगलं राहणार आहे.


कुंभ (Aquarius)


शुक्रवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न कराल. परिश्रमाचे अनुरूप लाभ न मिळाल्याने निराशा होऊ शकते.


मीन (Pisces)


या शुक्रवारी तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल होतील. तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करू शकता. याशिवाय तुमच्या नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे.