Horoscope 29 January 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असून आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आज 100 वर्षांनी संकष्टीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


मेष (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी दिवस थोडा कठीण असणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता कुटुंबात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 


वृषभ (Taurus Zodiac) 


कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी संवाद साधल्याशिवाय काम होणार नाही. व्यापारी वर्गाने पैशाचा अपव्यय टाळा नाहीतर संकटात या. कौटुंबिक प्रश्नांवर घरातील वडीलधाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


खूप विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा तुम्ही अडचणीत सापडू शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्या. योग आणि प्राणायाम तुमच्यासाठी हिताच ठरणार आहे. 


हेसुद्धा वाचा - साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!


कर्क (Cancer Zodiac)   


या लोकांना प्रमोशन मिळणार आहे. तुमच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे तुम्ही कुटुंबातील सर्वांचे लाडके होणार आहात.


सिंह (Leo Zodiac) 


नोकरदार व्यक्तींनी नकळत काही चूक केली असेल तर परिस्थिती बिघडण्याआधी ती वेळीच सुधारण तुमच्यासाठी हिताच ठरेल. प्रेम जोडप्यांना एकमेकांना साथ द्यावी लागणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac)  


नोकरदारांना आज लाभाची शक्यता आहे. भविष्य सुरक्षित करण्यासाठी वर्तमान जगणे तुमच्यासाठी हिताच ठरेल. भाऊ किंवा बहिणीकडून आर्थिक मदत होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Weekly Numerology : या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य


तूळ (Libra Zodiac)  


ही लोक ऑफिसमध्ये चांगले नेते म्हणून सिद्ध होणार आहे. बॉसकडून सार्वजनिकरित्या तुमचं कौतुक होणार आहे. कुटुंबात कुठल्या तरी विषयावरुन वाद होऊ शकतो. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)  


वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन संधींबद्दल सतर्क राहवं लागणार आहे. अतिवेगाने वाहन चालवू नये आणि त्याहीपेक्षा चालताना सावध राहा. 


धनु (Sagittarius Zodiac) 


या लोकांनी जबाबदाऱ्यांना ओझे समजू नये, अन्यथा छोटेसे कामही डोंगरासारखे वाटेल आणि तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. 


मकर (Capricorn Zodiac)  


तुम्ही नेहमी बरोबर आहात असा विचार करणे तुम्हाला महागात पडू शकतं. तुम्हाला घरामध्ये विश्वासू व्यक्तीची साथ मिळणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


या लोकांची त्यांच्या बॉसशी चांगली केमिस्ट्री जमणार आहे.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना हुशारीने गुंतवणूक करावी. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतित असणार आहात. 


मीन (Pisces Zodiac) 


विशेषत: वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असणार आहे. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस अनुकूल असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)