मुंबई : प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी अनुकूल तर प्रतिकूल त्यामुळे आपला दिवस कसा असणार याची पूर्वकल्पना आपल्याला मिळाली तर दिवसाचं नियोजन करणं अधिक सोपं होतं. त्यासाठीच जाणून घ्या आजचं राशीभविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवार आपल्यासाठी अविस्मरणीय दिवस असेल. तुमच्या हुशारीच्या मदतीने तुम्ही कामात यश प्राप्त कराल. शुक्रवारी कामकाजासाठी उत्तम दिवस असेल. 


वृषभ (Taurus)


शुक्रवारी तुमच्या कौटुंबिक जीवनात चढउतार येतील. तुमचे परिश्रम आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी करण्यात मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.


मिथुन (Gemini)


शुक्रवारी तुमचा दिवस चांगला सुरू होईल. कामासाठी किंवा कौटुंबिक आनंदासाठी तुमचा दिवस चांगला असेल. शुक्रवार तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण काळजी घेईल.


कर्क (Cancer)


सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.


सिंह (Leo)


शुक्रवारी नशीब तुमच्या पाठीशी असेल. मंगल कार्यात भाग घेईल. तुमच्या बोलीने तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी कराल. कामाच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.


कन्या (Virgo)


या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.


तूळ (Libra)


शुक्रवारी दिवस फारसा चांगला जाणार नाही. आपणास संघर्ष परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा आधार मिळेल. म्हणून हार मानू नका आणि पुढे असलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करा. या दिवशी तुम्हाला तुमच्या नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल.


वृश्चिक (Scorpio)


शुक्रवार या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.


धनु (Sagittarius)


शुक्रवारी नशीब तुमच्या पाठीशी असेल. कामात तुमची कामगिरी चांगली राहणार आहे. बोलण्याची कला तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागणार नाही.


मकर (Capricorn)


शुक्रवारी उत्साहाने भरलेला असेल. नशीब तुमच्या सोबत असेल. कामात उत्साह असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट घ्याल. यामुळे आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.


कुंभ (Aquarius)


शुक्रवारी कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळवू शकता. तुमचे सर्व काम यशस्वी होईल. शुक्रवार हा पैशासाठी खूप महत्वाचा असेल. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी बोलू शकता.


मीन (Pisces)


स्वतःवर विश्वास ठेवा.अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. आरोग्यावर लक्ष द्या.