Horoscope 3 April 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी दुसऱ्यांसोबत व्यवहार चांगला राहणार आहे. संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. जोडीदार आणि मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. हुशारीने कामात यश मिळवता येणार आहे.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी नशीब तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवणार आहात. 


सिंह (Leo)


आजचा दिवशी परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकते. लग्नासाठी चांगला योग आहेत.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी आर्थिक क्षेत्रात यशाच्या दिशेने वाटचाल होणार आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींची कलात्मक कार्यात आवड वाढणार आहे. काही लोकांना तुमची उदारता आवडणार असून ते तुमच्यावर खूश होणार आहेत.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींचा कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवू नका, महागात पडू शकतं.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी अनावश्यक राग आणि तापटपणा टाळणं फायदेशीर ठरणार आहे. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होणार आहे.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकणार आहे. तुमच्या हातून चांगले कार्य घडणार आहे, त्यामुळे कुटुंबातील सदस्यही खूश होतील.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता टाळता येत नाही. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कर्ज घेणं किंवा देणं शक्यतो टाळावं लागणार आहे. घरातील वातावरण बिघणार नाही, याबाबत तुम्हाला सतर्क रहावं लागेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)