Horoscope 3 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे वाहन वापरणे टाळावे अन्यथा अपघात होऊ शकतो.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळणार नाही. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी कुटुंबीयांबरोबर धार्मिक सहलीला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या पालकांच्या तब्येतीची थोडी काळजी करू शकता. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तींद्वारे मोठे नुकसान सहन करावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील. एखादे काम व्यवसायात दीर्घकाळ अडकले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमात कुटुंबीयांबरोबर थोडा वेळ घालवा. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुमचे रखडलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी व्यवसायात मोठा अडथळा येऊ शकतो. तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवू शकतो.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये तुमचा आदर वाढेल. व्यवसाय वाढवण्याचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तो काळजीपूर्वक घ्या. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )