Horoscope 4 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील. लहान गोष्टीतून सकारात्मक, फायद्याची गोष्ट घडू शकते. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी विचार करत असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी नोकरीत एखादा सन्मान मिळेल. व्यापार आणि नोकरीत फायदा होणार आहे. गुंतवणुकीचा फायदा होईल.  


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी नाती आणि नातेवाईक जपा. काही प्रश्न पुढे उपस्थित राहतील. अधिक जबाबदारीचं काम मिळेल. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी इतरांच्या मदतीनं तुम्हाला आनंद मिळेल. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी मोठं टेन्शन कमी होऊ शकतं. जवळच्या लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी मन दुसऱ्या कामांमध्ये गुंतवावं. वेळेत अपूऱ्या इच्छा पूर्ण होतील.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. माहिती मिळवण्यासाठी नवे मार्ग अंमलात आणा. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी शत्रूंवर तुमचं वर्चस्व असेल. पूर्ण एकाग्रताने काम करावं. चांगल्या बातमी प्रतिक्षा कराल. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी नव्या ओळखी होतील. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने प्रगती कराल.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी गुंतवणुकीमुळे फायदा मिळेल. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )