Horoscope 5 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. उच्च अधिकाऱ्यांशी बोलण्यात गोडवा ठेवा. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी कोणतीही मोठी व्यवसाय योजना फलदायी ठरेल. वरिष्ठ सदस्यांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात आज तुम्हाला यश मिळेल. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात तोटा होणार आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुमच्या महत्त्वाकांक्षा तुमच्या पालकांना सांगण्याची योग्य वेळ आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रास होईल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी तुमचे खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. न बोलवूनही येणाऱ्या पाहुण्यांमुळे डोकेदुखी वाढेल


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तुमची शक्ती वापरा. तुमचे रखडलेले पैसेही परत मिळतील. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कोणत्याही वादात पडू नका. अतिरिक्त खर्च होईल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले वाद वाढू शकतात.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खरेदी कराल. रखडलेली कामे एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीनं पूर्ण होतील.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी अनोळखी लोकांना व्यवसायात भागीदार बनवू नका. जवळच्या व्यक्तीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )