Horoscope 5 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी मित्र-परिवारासोबत आनंदाचा क्षण घालवाल. पैशाची रखडलेली सर्व काम सुरळीत होतील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी ज्यागोष्टीत प्रयत्न कराल तेथे यश मिळेल. आज काही गोष्टी अशा घडतील ज्याचं खापर तुमच्यावर पडेल.   


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी कामात भरघोस यश मिळेल म्हणून प्रयत्नात राहा. आज एक आनंदवार्ता कानी येऊन तुमचा मूड बदलेल. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी राजकारणापासून दूर राहणंच पसंत करा. जुनी देणी परत मिळतील. कामाकडे थोडं अधिक लक्ष द्या. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी काही महत्वाचे निर्णय हे तुम्हाला विचारूनच घेतले जातील. जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाण्याची शक्यता आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी जवळच्या व्यक्तीसोबत वाद होईल त्यामुळे शांत राहा. कधी कधी काही गोष्टी दुरूनच करण उत्तम आहे.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना कुटुंबाकडून सपोर्ट मिळेल त्यामुळे कामात भरघोस यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सर्वांना संभाळून घ्यावे लागेल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करा. जवळच्या व्यक्तीसोबत खटके उडतील. योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी सकारात्मक विचार अनेक पर्याय खुले करु शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मित्रांची मदत करण्यासाठी पुढाकार घ्या. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कोणत्याही कामात संकोच बाळगू नका. दाम्पत्य जीवनामध्ये सुखावह प्रसंग अनुभवण्याची संधी मिळणार आहे. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी वरिष्ठ मोठ्या विश्वासानं तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार आहेत. आज मित्रांना भेटण्याची संधी आहे.  


मीन (Pisces)


आजच्या दिवशी स्वत:च्या हिंमतीने, शांत मनाने काम केल्यास यश मिळेल. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे, चांगल्या लोकांची मदत मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )