Horoscope 6 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी पैशाची रखडलेली सर्व काम सुरळीत होतील. आजचा दिवस तुम्हाला चहूबाजूंनी आनंद देणारा आहे.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी काही गोष्टी अशा घडतील ज्याचं खापर तुमच्यावर पडेल. आजचा दिवस एकांतात घालवण महत्वाचं ठरणार आहे. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी अनावश्यक खर्च कमी करून बचत करण्याचा विचार कराल. जवळच्या नातेवाईकाच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कौटुंबिक बाबींमध्ये काही वाद होऊ शकतात. गोष्टी टाळूनही तुम्ही त्यामध्ये अडकले जाणार आहात.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी जवळच्या व्यक्तीसोबत वाद होईल त्यामुळे शांत राहा. तुम्हाला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी दूरच्या ठिकाणच्या लोकांशी संपर्क साधून व्यवसाय करणं फायदेशीर ठरेल. तुम्ही कोणतेही काम कराल, ते नक्कीच पूर्ण होईल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना प्रलंबित पैसे मिळतील. एखादा मोठा निर्णय घेण्याची संधी मिळेल. योग्य निर्णय घेण्याच्या दिशेने आज वाटचाल कराल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी समस्यांवर अगदी सहज मार्ग निघणार आहे. आज निर्णय स्वत: घेण्यापूर्वी त्याविषयी इतरांशी चर्चा जरुर करा. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी आश्चर्यचकित होण्यापेक्षा प्रसंगांविषयी विचार करण्याचा प्रयत्न करा. वयाने लहानांचे सल्लेही आज फायद्याचे ठरणार आहेत.  


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी आवडीच्या व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. कोणतीही माहिती तुमच्यापर्यंतच न ठेवता ती इतरांपर्यंत पोहोचवा.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी फक्त निष्काळजीपणा टाळा. मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. महत्त्वाची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करा.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. चांगल्या वागणुकीमुळे सहजपणे इतरांची मदत मिळणार आहे.  


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )