Horoscope 7 April 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी गुंतवणूकीबाबत नवीन संधी येणार आहेत. व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळू शकणार आहे. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण होतील याची काळजी घ्या. एखाद्या अशा व्यक्तीशी भेट होण्याचा योग आहे ज्यामुळे तुम्हाला पुढील दिवसांत मदत होणार आहे.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी व्यवसायात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सकारात्मकदृष्टीने काम करावं लागणार आहे. कुटुंबियांकडून चांगली बातमी मिळणार आहे.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी शैक्षणिक कार्यात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. नोकरीत कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. 


सिंह (Leo)


आजचा दिवशी वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळणार आहे, त्यामुळे तयार रहा. वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहण्याची शक्यता आहे. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी अतिरिक्त ताणतणाव वाढू शकतो. आर्थिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्टनरशी वादविवाद होऊ शकतात.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होणार असून त्याने तुम्हाला आणि कुटुंबियांना आनंद मिळणार आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी जास्त विचार करण्यात वेळ घालवू नये. दिवस धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. पाठीशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी जोडीदार तुम्हाला आर्थिक मदत करणार आहे. अर्धवट असलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कार्यक्षेत्रातील घडामोडी तुमचं स्थान विचलीत करु शकतात. ऑफिसमध्ये कोणती व्यक्ती गुप्त रितीने तुम्हाला मदत करणार आहे. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभणार आहे. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कोणत्याही बाबतीत कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. चुकीच्या प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)