Horoscope 8 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी नोकरी करणाऱ्याची बढती होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राची भेट होण्याचा योग दिसून येतोय. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी ऑफिस आणि व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळू शकणार आहे. अडचणींची कामं पूर्ण होणार आहेत.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी जोडीदाराला देखील मनासारखा वेळ द्या. व्यवसायात किंवा नोकरीत आजचा दिवस थोडा खडतर असू शकतो.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी व्यवसायात लाभ होणार आहेत. होणाऱ्या खर्चांमुळे तुम्हाला फार फायदा होणार नाहीये. 


सिंह (Leo)


आजचा दिवशी आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करु नये. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी उपलब्ध होणार आहे.  


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात काहीसे चढउतार जाणवण्याची शक्यता आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्ती आज नोकरीच्या बाबतीत एखादा चांगला निर्णय घेऊ शकतील. येत्या दिवसांमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकणार आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी वर्तनातील बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनू शकतो. तुम्हाच्या मेहनतीचे फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी मेहनत आणि नशिबामुळे महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहेत. कोर्टाशी संबंधित काही समस्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळू शकणार आहे. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कोणाशी विनाकारण भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी. योजनांमध्ये नक्कीच अपेक्षित यश मिळू शकेल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुम्ही संभाषणाच्या जोरावर यशस्वी होऊ शकता. मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करावा लागू शकतो. सतर्कपणे पैसे खर्च करावे लागतील. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी वर्तमान स्थितीमुळे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना मोठी गुंतवणूक करण्यासाठी दिवस योग्य नाही. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)