Horoscope 9 April 2023 : `या` राशीच्या व्यक्तींनी नवीन गुंतवणूक करणं टाळावं!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Horoscope 9 April 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी व्यवहार जपुन करावे लागणार आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये वादविवादाचे पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी तुम्ही केलेल्या कामाचे कौतूक होणार आहे. तसंच कामाच्या ठिकाणी वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी व्यवसायात नवीन गुंतवणूक करणं टाळावं. विनाकारण एखाद्या प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी गुंतवणूक करावी जी भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून चांगलं सहकार्य लाभणार आहे.
सिंह (Leo)
आजचा दिवशी रोजगारात यश व लाभ मिळणार आहे. तसंच अनावश्यक कामासाठी तुमचा वेळ वाया घालू नका.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी अनावश्यक चिंता करू नये. कामकाजा संबंधीत नव्या कल्पना सुचणार आहेत.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळवसाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. नव्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी एखादी चिंता सतावणार आहे. जमीन- संपत्तीच्या व्यवहारांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील. काळजी घ्या कारण स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी नोकरी बदलण्याचा किंवा जास्त कमाई करण्याचा विचार येणार आहे. आर्थिक स्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी प्रॉप्रर्टीच्या कामामध्ये मोठा धनलाभ होऊ शकतो. स्वत:च्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यावं लागेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)