Horoscope 29 April 2024 in Marathi : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा प्रवास शुभ राहील. उतावीळ होऊ नका तुम्हाला शाही सन्मान मिळेल. नवीन योजनेवर काम कराल. कामात जास्त खर्च होईल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


आज तुम्हाला अचानक कुठूनतरी धनप्राप्ती होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मुलांचे आरोग्य बिघडू शकतं. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने दिवस आनंदात असणार आहे. तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


आज व्यवसायात लाभदायक होणार आहे. भविष्यातील कामात बुद्धीचा वापर करणे फायदेशीर ठरेल. अभ्यासात रुची वाढणार आहे. आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा अन्यथा चोरी होऊ शकते. 


कर्क (Cancer Zodiac)   


आज तुम्ही आध्यात्मिक कार्यात व्यस्त असणार आहात. कोर्टाचे काम तुमच्या बाजूने होणार आहे. लाभाच्या संधी मिळणार आहे. कौटुंबिक गुंतागुंतीमुळे मन अस्वस्थ असणार आहे. कौटुंबिक गोष्टींसाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


आज व्यावसायिक प्रवासातून लाभ मिळणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची शक्यता आहे. अन्नाचे सेवन काळजीपूर्वक करा अन्यथा आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.


कन्या (Virgo Zodiac)    


आज नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत जास्त काम करावं लागणार आहे. घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होणार आहेत. 


तूळ (Libra Zodiac)  


आज घराच्या सजावटीवर अधिक खर्च होणार आहे. कामात बदल होण्याची शक्यता असून तुम्हाला आळस जाणवणार आहे. लोक तुमच्या कामाची नक्कीच प्रशंसा करणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


आज तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लाभदायक परिस्थिती असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या नाराजीला सामोरे जावं लागणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac) 


आज जास्त धावपळ होणार आहे. तुमच्या अपूर्ण कामांना गती मिळणार आहे. गाणी-संगीतात रस राहणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. 


मकर (Capricorn Zodiac)   


आज पार्टी किंवा पिकनिकला जाण्याचा बेत आखणार आहात. तुमच्या कामात यश मिळणार आहे. जोडीदाराची तब्येतकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कोणतेही काम विवेकाने करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात बुद्धिमत्तेचा वापर करा. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


आज तुम्हाला जुन्या नातेवाईकांची भेट होणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. व्यवसाय चांगला चालणार आहे. मान-सन्मान वाढणार आहे. मात्र कोणाबद्दलही वाईट बोलू नका. खाण्यापिण्यात काळजी घ्या. 


मीन  (Pisces Zodiac)  


आज जमीन वाहन खरेदीचे नियोजन करणार आहात. तुमची बेरोजगारी दूर होणार आहे. मान-सन्मान वाढणार आहे. शत्रूंपासून सावध राहवे लागणार आहे. तब्येतमध्ये चढ उतार दिसणार आहे. सामाजिक कार्यातून लाभ मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)