Karwa Chauth 2022 Shopping:  दिल्लीच्या बाजारपेठा (Delhi Market) खरेदीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. यावेळी ज्या लोकांनी करवा चौथची खरेदी केली नाही ते दिल्लीच्या बाजारपेठेकडे वळू शकतात. यावेळी करवा चौथच्या (Karwa Chauth) निमित्ताने दिल्लीचे हे मार्केट फॅन्सी (fancy) आणि डिझायनर (designer) साड्यांनी फुलले आहेत. येथे तुम्हाला तुमच्यासाठी स्वस्त आणि नवीन फॅशनच्या (Fashion) एकापेक्षा एक साड्या मिळतील. जर तुम्ही खरेदी करण्यात तज्ञ असाल, तर तुम्ही येथे नमूद केलेल्या किमतीपेक्षा 50 टक्के कमी दराने कपडे खरेदी कराल. यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचा लुकही खूप सुंदर दिसेल. (Delhi Market News Designer sarees in just Rs 100 a great shopping opportunity on Karva Chauth nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. दिल्लीचे सरोजिनी नगर मार्केट (Delhi Sarojini Nagar Market)


दिल्लीत महिलांच्या वस्तूंच्या खरेदीचा विचार केला तर सरोजिनी नगरचे नाव प्रथम घेतले जाते. या मार्केटमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर वस्तू स्वस्त दरात मिळतील. येथे तुम्हाला 100 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत एकापेक्षा एक सुंदर साड्या मिळतील. करवा चौथच्या खरेदीसाठी हा बाजार तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.


आणखी वाचा - या अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का 


2. कमला नगर मार्केट (Kamala Nagar Market)
स्वत:साठी स्वस्त आणि सुंदर कपडे खरेदी करायचे असतील, तर कमला नगरची बाजारपेठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे मार्केट महिलांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असले तरी नोकरदार महिलांचे फॉर्मल कपडे येथे स्वस्तात मिळतात. येथे मॉल्समध्ये फॉर्मल कपड्यांची किंमत 2 ते 3 हजार रुपयांपासून सुरू होते, तर कमला नगरमध्ये स्वस्त फॉर्मल कपडे 200 ते 300 रुपयांना मिळतात.


3. लक्ष्मीनगर मार्केट (Laxminagar Market)


दिल्लीच्या लक्ष्मी नगर मार्केटमध्ये स्वस्त कपडे घेण्यासाठी लोक दूर-दूरवरून येतात. या मार्केटमध्ये, तुम्हाला साड्यांचे पूर्णपणे अनोखे आणि फॅन्सी कलेक्शन पाहायला मिळेल. येथे स्टायलिश साड्यांची भरमार आहे. या मार्केटचा फायदा असा आहे की येथे तुम्हाला स्वस्त श्रेणीत जड साड्या सहज मिळतील.


आणखी वाचा - Virginity म्हणेज काय? व्हर्जिनिटी बाबत प्रत्येक प्रश्नांची उत्तर